गंगापूर, तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गण असून, मतदानानंतर सर्व मतदान केंद्रांवरील साहित्य संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये पिंपळवाडी येथील पहिले मतदान केंद्र हे सर्वप्रथम साहित्य घेऊन साहित्य स्वीकृती कक्षात दाखल झाले. यांचा सत्कार करण्यात आला. वेळेत आणि शिस्तबद्धरीत्या साहित्य जमा केल्याबद्दल केंद्रप्रमुख व त्यांच्या सहाय्यकांचा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजय राऊत आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नवनाथ वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सध्या निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे राबवली जात असून, जिल्हा परिषदेसाठी एकूण ३६ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी एकूण ६७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व तयारी करण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.











